World Cup 2023: 'गोल्डन तिकीट' म्हणजे काय? अमिताभ पहिले मानकरी

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांची भेट घेतली आणि त्यांना गोल्डन तिकीट देऊन सन्मानित केलं.

जय शाहांनी अमिताभ यांना दिलेलं हे गोल्डन तिकीट नेमकं काय आहे हे जाणून घेऊया?

अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट मिळालंय म्हणजेच आता त्यांना खास व्हीआयपी स्टँडमधून सर्व सामन्यांचा पूर्णपणे मोफत आनंद घेता येणार आहे.

गोल्डन तिकीट हा एक प्रकारचा व्हीआयपी पास आहे जो काही निवडक लोकांनाच दिला जातो.

हे तिकीट असणाऱ्या व्यक्तीला सामन्यांचा मोफत आनंद घेऊ येतो आणि स्टेडियममध्ये विविध प्रकारच्या व्हीआयपी सुविधाही दिल्या जाणार आहेत.

BCCI ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून जय शाह यांनी अमिताभ बच्चन यांना गोल्डन तिकीट दिल्याचा फोटो शेअर केलाय.

अमिताभ बच्चन यांच्यानंतर बीसीसीआय आणखी अनेक बड्या व्यक्तींना हे गोल्डन तिकीट वाटप करण्याची शक्यता आहे.

VIEW ALL

Read Next Story