प्रेम अनेकदा अशा काही गोष्टी करण्यास भाग पाडतं ज्याची अपेक्षा आणि कल्पनाही करणं अशक्य असतं. या सेलिब्रिटी जोडीसोबतही असंह काहीसं झालं.
अतिशय कमी वेळात अभिनेता जॅकी श्रॉफ आणि आएशा श्रॉफ एकमेकांच्या प्रेमात पडले. पण, तेव्हा जॅकी मात्र कोणा दुसरीच्याच प्रेमात होते.
जॅकी जिच्यावर प्रेम करत होते, ती त्यांची प्रेयसी अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण करण्यासाठी अमेरिकेला गेली होती. इथं आएशा जॅकीवर जीव ओवाळून टाकत होती.
एकदा आएशानं जॅकीच्याच परवानगीनं त्यांच्या प्रेयसीला पत्र लिहिलं ज्यामध्ये तिनं तिला परत येण्याची विनंती केली.
'तू परत का नाही येत? तू भारतात आलीस की आपण जॅकीसोबत लग्न करू आणि एकत्र बहिणींसारख्या राहू...' असं त्या पत्रात तिनं लिहिलं.
खुद्द जॅकी श्रॉफच म्हणतात, असं झालं असतं तर आज माझ्या दोन बायका असत्या. कारण, जॅकी श्रॉफ यांच्यावरील प्रेमाखातर आएशा चक्क सवसीसोबतही नांदायला तयार होत्या.