सर्वात श्रीमंत अभिनेत्री

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीकडे होतं 28 किलो सोनं, 10500 साड्या आणि 900 कोटींची संपत्ती

सर्वाधिक मानधन

तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये 30 वर्षांपर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे, जयललिता. 1965 ते 1980 या कालावधीत सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये जयललिता यांच्या नावाचा समावेश होता. देशातील इतर आघाडीच्या अभिनेत्रीसुद्धा त्यांच्या श्रीमंतीची बरोबरी करू शकल्या नाहीत.

राजकीय वर्तुळात प्रवेश

1980 मध्ये जयललिता यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला निरोप देत राजकीय वर्तुळात प्रवेश केला आणि एका नव्या वाटचालीला सुरुवात केली.

Income Tax विभागाची धाड

1997 ला चेन्नईतील Poes Garden Residence या त्यांच्या निवासस्थानी Income Tax विभागाची धाड पडली.

10500 साड्या

आयकर विभागाच्या या धाडीमध्ये जयललिता यांच्याकडे 10500 साड्या, 750 चपलांचे जोड, 800 किलो चांदी आणि 28 किलो सोनं सापडलं.

21 किलो सोनं

पुढे 2016 मध्येही त्यांच्या घरावर आणखी एक धाड टाकण्यात आली. ज्यावेळी 1250 किलो चांदी आणि 21 किलो सोनं मिळालं होतं.

8 लक्झरी कार

जयललिता यांच्याकडे 42 कोटी रुपयांची संपत्ती आणि 8 लक्झरी कारही मिळाल्या होत्या.

एकूण संपत्ती

माध्यमांमध्ये उपलब्ध असणाऱ्या माहितीनुसार जयललिता यांच्याकडे 900 कोटी रुपयांची एकूण संपत्ती मिळाली होती. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये मात्र हा संपत्तीचा आकडा 188 कोटी रुपये इतका होता.

VIEW ALL

Read Next Story