'तारक मेहता...'मधील 'सोनू' करतेय लग्न; तिचा होणारा नवरा पाहिला?

'तारक मेहता..'

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या गाजलेल्या मालिकेत कमाल लोकप्रियता मिळवलेल्या भूमिकेत झळललेली अभिनेत्री झील मेहता आता लग्नबंधनात अडकणार आहे.

सोनूलग्नाआधी झील आणि तिच्या होणाऱ्या पतीनं त्यांच्या काही खास मित्रांसह समुद्रकिनारी स्पिन्स्टर्स आणि बॅचलर्स पार्टीत धमाल केली.

झील म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी 'सोनू' लवकरच आदित्य दुबे याच्यासोबत सहजीवनाची सुरुवात करणार आहे. लग्नासाठी झील अतिशय उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे.

बॅचलर्स पार्टी

लग्नाआधी झील आणि तिच्या होणाऱ्या पतीनं त्यांच्या काही खास मित्रांसह समुद्रकिनारी स्पिन्स्टर्स आणि बॅचलर्स पार्टीत धमाल केली. झीलचे या पार्टीतील क्षण बरेच चर्चेत आले. यामध्ये तिच्या आऊटफिटनं अनेकांच्या नजरा वळवल्या.

नव्या जीवनाची सुरुवात

झील आणि आदित्य येत्या काही दिवसांतच त्यांच्या नव्या जीवनाची सुरुवात करणार असून, चाहत्यांमध्येही याबबात कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

शुभेच्छा

सोशल मीडियावर तिचे हे फोटो प्रसिद्ध होताच चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये झीलला चाहते शुभेच्छा देताना दिसत आहेत.

साखरपुडा

काही महिन्यांपूर्वीच झील आणि आदित्यचा साखरपुडा झाला होता. नात्याची अधिकृत ग्वाही देत तिनं हा क्षण सर्वांपुढे अतिशय सुरेखरित्या आणला होता.

पती

झीलचा होणारा पती, आदित्य व्हिीडओ गेम, ई स्पोर्ट्स आणि थ्रीडी आर्ट या क्षेत्रात काम करतो असं म्हटलं जात आहे.

व्यवसाय

शिक्षणासाठी म्हणून मालिकेतून काढता पाय घेणाऱ्या झीलनं शिक्षणानंतर व्यवसाय क्षेत्रात उडी घेत नव्या कारकिर्दीला यशस्वी सुरुवात केली होती.

VIEW ALL

Read Next Story