कंगनाच्या भावाच्या हळदीचे फोटो पाहताच हिमाचल प्रदेशच्या पारंपरिक विधींच्या प्रेमात नेटकरी

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा भाऊ वरुण बोहल्यावर चढणार आहे. वरुणच्या हळदीच्या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगनाचा भाऊ वरुण याचं लग्न हिमाचल प्रदेशमध्ये होणार आहे. वरुणची हळद,मेहंदी आणि इतर लग्नाच्या विधींचे फोटो कंगनाने इंस्टाग्रावर पोस्ट केले आहेत.

कंगनाच्या घरातील हा हळदीचा समारंभ अगदी साध्या पद्धतीने पार पडला.

वरुणच्या साखरपुड्याला कंगनाने त्याला फ्लॅट गिफ्ट केला.

वरुणच्या हळदीचे विधी हे हिमाचल प्रदेशमधील पारंपरिक पद्धतीने करण्यात आले.

या कार्यक्रमात कंगनाने पारंपरिक ड्रेस परिधान केला होता. गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस आणि मोरपिशी रंगाची ज्वेलरीमध्ये कंगना खूपच सुंदर दिसत होती.

हळदीच्या निमित्ताने कंगना खूप दिवसांनी तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवत होती.

कंगनाने सिनेमात बरेच बोल्ड सिन केले, मात्र खऱ्या आयुष्यात तिला साधी राहणी खुप आवडते.

कंगनाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'ती परंपरा आणि संस्कृती यांना खूप जास्त महत्त्व देते'.

VIEW ALL

Read Next Story