अभिनेत्याला देण्यासाठीही नव्हते पैसे, नाईलाज म्हणून स्वत:च केला अभिनय; आज कोटींमध्ये खेळतोय
सिनेमा, अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनाविषयी नितांत आदर असणारा आणि या कलेमध्ये स्वत:ला झोकून देणाऱ्या या अभिनेत्यानं एक अप्रतिम कलाकृती साकारली.
स्थानिक भाषेला प्राधान्य देत त्यानं किमान आर्थिक पाठबळाचा वापर करत या अभिनेत्यानं दिग्दर्शनाची धुरा लिलया पेलत रुपेरी पडद्यावर अशी छाप सोडली की पाहणारेही पाहतच राहिले.
एक गाव, तिथं असणारी प्रथा, समजुतींची जोड आणि प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांचा संदर्भ देत या अभिनेत्यानं ही कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणली. या कलाकृतीचं नाव 'कांतारा'.
जागतिक स्तरावर 'कांतारा'ला इतकी लोकप्रियता मिळाली की, शब्दांतही मांडणं कठीण. अशा या चित्रपटानं तब्बल 450 कोटींची कमाई केली. ज्यानंतर हाच चित्रपट हिंदी भाषेतही प्रदर्शित झाला.
या चित्रपटाला यश मिळण्यापूर्वी ऋषभ शेट्टीनं बराच संघर्ष केला. कसेबसे पैसे जोडून त्यानं हा चित्रपट साकारला. चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी त्याला कोणीही अभिनेता भेटला नाही.
सरतेशेवटी खर्च वाचवण्यासाठी म्हणून त्यानं स्वत:च अभिनेत्याचं काम केलं. नाईलाजानं वाट्याला आलेल्या भूमिकेसाठी ऋषभनं स्वत:ला झोकून दिलं आणि त्याच्या अभिनाचा चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ज्याचे परिणाम चित्रपटाच्या दमदार कमाईमध्ये दिसले.