करिना कपूर दोन मुलांची आई

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर दोन मुलांची आई आहे. अनेक महिलांसाठी करिना कपूरने आई म्हणून आदर्श उभा केला आहे.

आई म्हणून अनेकांसाठी प्रेरणा

अभिनयात व्यग्र असतानाही करिना ज्याप्रकारे मुलांचा सांभाळ करते, त्याचं कौतुक केलं जातं. दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूरला एक वेगळा प्रश्न विचारण्यात आला.

Homosexual लग्नासंबंधी मुलांना काय सांगितलं?

तू आपल्या मुलांना होमोसेक्शुअल रिलेशनशिपबद्दल कसं सांगतेस? अशी विचारणा करिनाला करण्यात आली.

अंकल जॅकने पुरुषाशी लग्न केलं तर...

अंकल जॅकने पुरुषाशी लग्न केलं आहे हे कसं सांगशील असा प्रश्न विचारण्यात आला.

'प्रेमाला सीमा नाहीत'

करिनाने उत्तर देताना सांगितलं की "कारण तो त्याच्यावर प्रेम करतो. प्रेम एखाद्याचं लिंग, आकार पाहून होत नाही. आईला वडिलांवरच प्रेम करावं लागेल असं आपण म्हणू शकत नाही".

'जॅक जॉनवरही प्रेम करु शकतो'

"हे ठीक आहे. कधीकधी जॅक जॉनवरही प्रेम करु शकतो. तसंच तृषाला पृषावरही प्रेम होऊ शकतं. प्रेमाची कोणतीही सीमा नसते".

सोशल मीडियावर कौतुक

करिना कपूरच्या या विधानाचं सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. तसंच ती ज्याप्रकारे मुलांना शिकवण देत आहे त्याचीही स्तुती केली जात आहे.

करिनाच्या विधानावर प्रतिक्रिया

करिनाच्या विधानावर अनेक मातांनीही प्रतिक्रिया दिली आहे. आपणही आपल्या मुलांना अशीच शिकवण देऊ असं त्या म्हणाल्या आहेत.

LGBTQ ला पाठिंबा

करीनाने याआधी LGBTQ ला आपला पाठिंबा दर्शवला होता. या लोकांना आपल्यापेक्षा वेगळं समजू नको असं मी मुलांना शिकवत असते असं ती सांगते.

'जाने जान' चित्रपट लवकरच भेटीला

करिना कपूर सध्या आपला आगामी चित्रपट 'जाने जान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटासह ती ओटीटीमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात विजय वर्मा आणि जयदीप अहवालतही आहेत.

VIEW ALL

Read Next Story