हिंदू धर्मात नारळाचा उल्लेख हा श्रीफळ म्हणून केला जातो. प्रत्येक शुभकार्यात नारळाचे महत्त्व अधिक असते. नारळ नसेल तर कोणतीही पूजा, होमहवन संपन्न होत नाही.
हिंदू धर्मात पूजेसाठी नारळ चढवणे खूप महत्त्वाचे मानले जाते. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार स्त्रिया नारळ फोडू शकत नाही. याचे कारण काय जाणून घ्या?
धार्मिक मान्यतेनुसार, पृथ्वीवर पहिल्यांदा फळ म्हणून भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीसोबत नारळ पाठवला होता.
नारळावर फक्त देवी लक्ष्मीचा अधिकार असतो. त्यामुळंच महिलांना नारळ फोडण्यास थांबवले जाते.
असं म्हणतात की, नारळात त्रिदेवांचा वास आहे. नारळाच्या वरच्या भागात असलेले तीन डोळे हे भगवान शिवाच्या त्रिनेत्राचे प्रतीक आहेत.
शास्त्रानुसार, विष्णु भगवान आणि देवी लक्ष्मी नारळाचे झाड व कामधेनू पृथ्वीवर घेऊन आले होते. म्हणूनच नारळाला कल्पवृक्षदेखील म्हटले जाते.
असं म्हणतात की घरात नारळ फोडल्याने नकारात्मकता दूर होते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)