KCB मध्ये 1 कोटी जिंकल्यानंतरही जसकरन होणार नाही करोडपती कारण...

Swapnil Ghangale
Sep 07,2023

15 व्या सीझनचा पहिला करोडपती

पंजाबमधील जसकरन सिंग हा कौन बनेगा करोडपतीच्या 15 व्या सीझनचा पहिला करोडपती ठरला आहे.

पंजाबमध्ये राहतो

15 व्या पर्वातील 17 व्या एपिसोडमध्ये 21 वर्षीय जसकरन सिंग सहभागी झाला होता. तो पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यात राहतो.

खात्यात 1 कोटी जमा होणार नाही

7 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर ठाऊक नसल्याने त्याने माघार घेतली. मात्र एक कोटी जिंकल्यानंतरही जसकरनच्या खात्यात 1 कोटी जमा होणार नाहीत.

जिंकलेला सर्व पैसा मिळणार नाही

आता 1 कोटी जिंकूनही जसकरनच्या खात्यावर एवढे पैसे का येणार नाही असा प्रश्न पडला असेल तर त्यामागे एक खास कारण आहे.

30 टक्के आयकर

बक्षिस म्हणून मिळालेल्या रक्कमेवर अनेक प्रकारचे टॅक्स लागतात. केबीसीमध्ये जिंकलेल्या रक्कमेवर एकूण 30 टक्के आयकर आकारला जातो. यानंतरही 10 टक्के उपकर आकारला जातो.

द्यावा लागणार कर

आयकर आणि उपकर आकारल्यानंतर 4 टक्के सेस ही या रक्कमेवर आकारला जातो. जसकरनलाही हे कर द्यावे लागणार आहे.

खात्यावर किती रक्कम येणार?

त्यामुळे 1 कोटी जिंकणाऱ्या जसकरनच्या खात्यावर केवळ 65.68 लाख रुपये जमा होणार आहेत.

34 लाख 32 हजार कर

म्हणजेच जसकरनला कर म्हणून तब्बल 34 लाख 32 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

7 कोटींवर अडीच कोटींचा कर

केबीसीमध्ये 1 कोटीहून अधिक रक्कम जिंकल्यास 15 टक्के उपकर द्यावा लागतो. म्हणजे 7 कोटींवर सर्व कर पकडून 2 कोटी 51 लाखांहून अधिक कर लागतो.

7 कोटींच्या प्रश्नावर खेळ सोडला

केवळ 4 कोटी 48 लाखांची रक्कम विजेत्याच्या खात्यावर जमा होते. जसकरनने 7 कोटींच्या प्रश्नावर क्विट केलं.

VIEW ALL

Read Next Story