नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, किंग खान ओळख असलेल्या शाहरुखची एकूण संपत्ती 6 हजार कोटी इतकी आहे.
मागील 4 वर्षांपासून तिकीटबारीवर सातत्याने अपयशी ठरलेल्या शाहरुखने यंदाच्या वर्षात 'पठाण' आणि 'जवान'सारखे दमदार चित्रपट दिले.
शाहरुखच्या 'पठाण' आणि 'जवान' या दोन्ही चित्रपटांनी प्रत्येकी एक हजार कोटींची कमाई केली.
शाहरुख खानने मनोरंजन सृष्टीमधील कामासाठी पहिला पगार किती मिळाला होता याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता.
पंकज उदास यांच्या कॉनसर्टमध्ये काम केल्याबद्दल शाहरुखला पहिला पगार चेक स्वरुपात मिळालेला.
"मी तरुण असताना फार प्रवास केला आहे. पंकज उदास यांच्या कॉनसर्टमध्ये काम केल्याबद्दल मला पहिला पगाराचा चेक मिळालेला. तो 50 रुपयांचा होता. आम्ही त्यावेळी ताजमहालला गेले होतो," असं शाहरुख पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं.
मी माझा संपूर्ण पगार फक्त ट्रेनच्या तिकीटामध्ये येण्याजाण्यामध्ये घालवला. मात्र माझ्याकडे थोडे पैसे उरलेले ज्या पैशांची मी लस्सी प्यायलो, असं शाहरुखने सांगितलेलं.
त्या लस्सीमध्ये माशी पडली होती. ती काढून आपण लस्सी प्यायलो. मात्र घरी आल्यावर मला उलटी झालेली, असंही शाहरुखने सांगितलेलं.
शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'डंकी' हा 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.