पराभवानं खचलेल्या रोहितचे 10 Inspirational Quotes तुम्हालाही आशेचा नवा किरण दाखवतील

रोहितला मैदानात रडू आलं

वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना पराभूत झाल्यानंतर रोहित शर्माला मैदानात रडू आलं.

प्रेरणादायी वक्तव्यांसाठीही ओळला जातो

मात्र रोहित शर्मा हा खणखर स्वभावाचा आणि त्याच्या प्रेरणादायी वक्तव्यांसाठीही ओळला जातो.

पाहूयात रोहित शर्माचे 10 Inspiration Quotes

मेहनतीला पर्याय नाही

"तुम्ही किती टॅलेंटेड आहात किंवा तुमच्यात किती नैसर्गिक टॅलेंट आहे हे महत्त्वाचं नसतं. तुम्हाला तुमच्या कामगिरीचा स्थर जपायचा असेल तर मेहनतीला पर्याय नाही."

तुम्हाला टीव्हीवर क्रिकेट सोपं वाटतं पण...

"क्रिकेटमध्ये काहीच सोपं नाही. तुम्ही टीव्हीवर क्रिकेट पाहताना तुम्हाला ते सोपं वाटत असेल. मात्र ते तसं नक्कीच नाही. तुम्हाला तुमचं डोकं लावून टायमिंगने बॉल टोलवावा लागतो."

आपण नियंत्रण ठेऊ शकतो अशा काही गोष्टी असतात, मात्र...

"आपण नियंत्रण ठेऊ शकतो अशा काही गोष्टी असतात. मात्र अशाही बऱ्याच गोष्टी असतात त्यावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. अशा गोष्टींवर वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यात अर्थ नसतो."

प्रत्येकाची शैली वेगळी असते..

"प्रत्येकाची शैली वेगळी असते माझी पण तयारी ही परिस्थितीवर अवलंबून असतो प्रतिस्पर्धी संघ कोण आहे यावर नाही."

तुम्ही नेतृत्व करत असता तेव्हा...

"तुम्ही जेव्हा तुमच्या देशासाठी खेळता तेव्हा तुमच्यावर जबाबदारी असते. मात्र तुम्ही कर्णधार असता तेव्हा तुम्हाला समोर राहून नेतृत्व करावं लागतं आणि तुमच्या सूचनांचं संघाकडून पालन होत आहे याची काळजी घ्यावी लागते."

लक्ष्य निश्चित असलं पाहिजे

"तुमचं एखादं लक्ष्य निश्चित असलं पाहिजे. त्या लक्ष्यामुळेच तुम्ही प्रेरित होत राहता."

मन स्थिर नसतं

"लोकांचं मन स्थिर नसतं. एका रात्रीत गोष्टी घडाव्यात असं त्यांना वाटतं. त्यांना त्यावेळी संबंधित व्यक्तीच्या परिस्थितीची आणि आजूबाजूच्या गोष्टींची काहीही कल्पना नसते."

प्रत्येक सामना महत्त्वाचा

"प्रत्येक प्रथम श्रेणी क्रिकेटचं सिझन महत्त्वाचं असतं. तुम्ही भारतीय संघात असो किंवा नसो इथला प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो."

मी काही गेल किंवा धोनी नाही

"मी काही ए. बी. डिव्हिलियर्स, गेल किंवा धोनीसारखा नाही. माझ्याकडे फार ताकद नाही. मला मैदानात माझं डोकं वापरुन मी त्या कुशल आहेत त्याचा म्हणजेच आडव्या पट्ट्यांचे फटके मारवण्यावर अवलंबून रहावं लागतं."

सारे मनाचे खेळ

"पुनरागमन करणं सोपं नसतं. मोठ्या शस्त्रक्रीयेनंतर तुम्हाला मनातील नकारात्मक गोष्टींवर नियंत्रण मिळवावं लागतं. हे सारे मनाचे खेळ आहेत. या भीतीवर केवळ प्रत्येक व्यक्ती ज्याच्या त्याच्या स्तरावर मात करु शकतो."

VIEW ALL

Read Next Story