रुपेरी पडद्यानं प्रसिद्धी दिली खरी, पण खासगी जीवनामध्ये मात्र दु:खच इतकं होतं, की ही वेळ कोणावरही येऊ नये असंच या अभिनेत्रीकडे पाहताना सर्वांना वाटलं.
या अभिनेत्री म्हणजे, रामायणात 'मंथरा' हे पात्र साकारणाऱ्या ललिता पवार. वयाच्या 9 व्या वर्षापासूनच त्यांनी अभिनयास सुरुवात केली होती.
कलाजगतात प्रसिद्धी मिळत असताना वैयक्तिक जीवनात मात्र त्या अडचणींचा सामना करत होत्या.
दिग्दर्शक गणपत राव यांच्याशी त्यांनी लग्न केलं होतं. पण, लग्नानंतरच काही वर्षांनी पतीच्या विवाहबाह्य प्रेमसंबंधांची त्यांना माहिती मिळाली.
ललिता यांच्या धाकट्या बहिणीवरच त्यांच्या पतीचा जीव जडला होता. ही बाब कळताच त्यांनी पतीपासून दुरावा पत्करत दिग्दर्शक राज कुमार यांच्याशी लग्न केलं.
दुसऱ्या लग्नानंतर ललिता पवार यांना कर्करोगानं ग्रासलं. जीवनातील अखेरच्या दिवसात त्या एकट्या पडल्या होत्या.
ललिता पवार यांनी फोनचं उत्तर न दिल्यामुळं त्यांचा मुलगा पुण्यात पोहोचला, जिथं त्यांचा मृतदेह पाहून तो हादरला.
ललिता पवार यांचा तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. त्यांचे अखेरचे दिवस अनेकांच्या डोळ्यात पाणी आणून गेले.