मराठी चित्रपटातील सर्वात मोठा स्टार, अशोर सराफांची संपत्ती किती?

मराठी, हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशोक सराफ यांचे अभिनंदन केले.

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले, अशी प्रतिक्रिया यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

80 आणि 90 च्या दशकात मराठी सिनेसृष्टीत सर्वात जास्त मागणी असलेल्या अभिनेत्यांमध्ये अशोक सराफांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं.

अशोक सराफांनी केलेले सिनेमा, साकारलेली पात्र अजरामर आहेत.

अशोक सराफ यांच्या अभिनय, वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा सुरु आहे. त्यांची एकूण संपत्ती किती आहे? तुम्हाला माहितीय का?

अशोक सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 37 कोटी रुपये असल्याचे वृत्त माध्यमांतून समोर आले आहे.

यात अशोक सराफ यांच्या ब्रँड एंडोर्समेंटचाही समावेश आहे.

निवेदिता जोशी- सराफ यांची एकूण संपत्ती जवळपास 10 कोटी रुपये आहे.

नाटक, सिनेमे, मालिका आणि जाहिराती अशा अनेक माध्यमांतून अभिनेत्रीनेही कष्टाने संपत्ती मिळवली आहे.

VIEW ALL

Read Next Story