मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. सध्या अमृता ही 'लुटेरे' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.

या वेबसीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. शुक्रवारी 22 मार्चपासून डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही वेबसीरिज प्रदर्शित झाली.

यामध्ये अमृता खानविलकरसह रजत कपूर, दीपक तिजोरी, विवेक गोंबर,आमिर अली आणि चंदन रॉय सन्याल हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकत आहेत.

आता नुकतंच अमृता खानविलकरने एक फोटोशूट केले आहे. यात तिचा डॅशिंग अदाज पाहायला मिळत आहे.

या फोटोशूटसाठी तिने कोऑर्ड सेट आणि ब्लेझर असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे.

यासोबतच तिने सुंदर ज्वेलरी आणि या लूकला साजेसा मेकअपही केला आहे.

अमृताच्या या फोटोशूटवर तिच्या लंडनला राहणाऱ्या मित्राने कमेंट केली आहे. त्यावर तिने उत्तरही दिले आहे.

'अमू, तु आजकाल कुठे आहेस?' प्रादेशिक भाषेतील काही प्रोजेक्टवर काम करत आहेस का, असा प्रश्न त्याने विचारला आहे.

त्यावर अमृताने 'सध्या मी 'लुटेरे' वेबसीरिजचे प्रमोशन करत आहेत, तू पाहिलास का?' असे तिने विचारले आहे.

यावर त्याने 'ही वेबसीरिज लंडनमध्ये प्रदर्शित झाली की नाही, याची मला खात्री नाही. पण मी तो नक्कीच बघेन', असे म्हटले आहे. सध्या अमृता आणि तिच्या मित्राचे हे संभाषण व्हायरल होताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story