मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे.
आता अमृताने एक खास फोटोशूट केले आहे.
यात तिचा डेनिम लूक पाहायला मिळत आहे.
यावेळी अमृताने डेनिम स्कर्ट, डेनिम जॅकेट आणि ब्लॅक ब्रालेट असा लूक केला होता.
या फोटोंना तिने हटके कॅप्शनही दिले आहेत. “प्रचंड उन्हामुळे आज पार्किंगमध्ये फेरफटका मारण्याचा निर्णय घेतला” असे तिने काही फोटोंना कॅप्शन दिले आहे.
तर इतर फोटोंना तिने “उन्हाळ्यात जेव्हा ऊन आपल्या चेहऱ्यावर येतं तेव्हा आपल्यापैकी बहुतेकजण असं करतात” असे कॅप्शन दिले आहे.