'केला श्रृंगार आज घातलंय साज...', गुलाबी साडीत खुललं अपूर्वा नेमळेकरचे सौंदर्य

‘गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सर्वांना वेडं लावलं

संजू राठोड आणि प्राजक्ता घाग यांच्या ‘गुलाबी साडी’ या गाण्याने सध्या सर्वांना वेडं लावलं आहे. या गाण्यावर सेलिब्रेटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वजण रील्स बनवताना दिसत आहेत.

अपूर्वा नेमळेकरलाही या गाण्याची भूरळ

माधुरी दीक्षित, रेमो डिसुझा, किली पॉल, मुंबई इंडियन्सचे खेळाडू यांच्यापाठोपाठ आता मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरलाही या गाण्याची भूरळ पडली आहे.

रील व्हिडीओ

अपूर्वा नेमळेकरने या गाण्यावर एक रील व्हिडीओ बनवला आहे.

फोटोही शेअर

त्यासोबतच तिने गुलाबी साडीतील लूकमधील काही फोटोही शेअर केले आहेत.

नऊवारी साडी

यात अपूर्वाने गुलाबी रंगाच्या तीन शेड्स असलेली नऊवारी साडी परिधान केली आहे.

त्यावर तिने साजेसे दागिने, मेकअप आणि हेअरस्टाईलही केल्याचे पाहायला मिळत आहे.

अपूर्वाने या फोटोंना कॅप्शन देताना 'गुलाबी साडी' असे म्हटले आहे.

सध्या अपूर्वा ही 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत नकारात्मक पात्र साकारताना दिसत आहे.

VIEW ALL

Read Next Story