'मला एखाद्या राणीसारखं वाटत...', नथ, नऊवारी साडी नेसून प्राजक्ता माळीचा मराठमोळा शृंगार

Published by: Zee Team | Jun 29, 2023

ब्रँडसाठी फोटोशूट

नुकतेच प्राजक्ताने काही नऊवारी साडी आणि तिच्या ब्रँडसाठी फोटोशूट करण्यात आलेले फोटो पोस्ट केले असून तुफान व्हायरल झाले आहेत.प्राजक्ताच्या या सोज्वळ सौंदर्याने इंटरनेटवर नुसती आग लागली आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

हिरव्याकंच नऊवारीत फोटो

प्राजक्ताने अत्यंत लाघवी आणि ठसकेबाज असे हिरव्याकंच नऊवारी साडीमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये प्राजक्ताचे रूप ठसकेबाज आणि पाहतच राहण्यासारखे आहे. नऊवारीतील तिच्या अदा या हृदयवार थेट वार करत आहेत.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

ठसकेबाज, करारी लुक

प्राजक्ताने हिरवीकंच साडी ज्याला लाल जरीकाठ आहे नेसली असून त्याला मॅचिंग असा ब्लाऊज घातला आहे. तिचा हा लुक एखाद्या जुन्या महाराणीचा असल्यासारखा भासतोय. अत्यंत ठसकेबाज आणि करारी असा हा लुक दिसून येतोय.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

नाकात ठसठशीत नथ

प्राजक्तराज म्हणून प्राजक्तांचा स्वतःचा ब्रँड असून प्राजक्ताने सर्व दागिने घालून हा लुक दिसून येतोय. नाकात ठसठशीत नथ, चिंचपेटी, पुतळीमाळ, कंबरपट्टा आणि हातात सोन्याच्या बांगड्या आणि हिरव्या बांगड्या घालून तिने एखाद्या नव्या नवरीचा लुक केला आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

मराठमोळा लुक

कपाळावर मोठी ठसठशीत चंद्रकोर लावत प्राजक्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यासह प्राजक्ताने अगदी माफक मेकअप करत मराठमोळा लुक केला आहे आणि कोणत्याही सणासाठी हा लुक तुम्हीही कॅरी करू शकता.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

मराठमोळा खोपा

अगदी परफेक्ट मराठमोळा खोपा प्राजक्ताने घातला आहे आणि तर हातात वाकी अर्थात बाजूबंद घालून तिने तिचा लुक पूर्ण केलाय. प्राजक्ताच्या चेहऱ्यावरून आणि पेहरावावरून कोणाचीही नजर हलणार नाही असंच दिसून येतंय.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण

नववारी साडीवरचे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, सोन्या-चांदीच्या दरांमध्ये घसरण. गुंतवणूकीसाठी उत्तम काळ. अशी बातमी बघितली; मग पटकन @prajaktarajsaaj च्या “तुळजा कलेक्शन (सोन्याचे अलंकार) मधील photos post करायला घेतले.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

एखाद्या राणीसारखं वाटत

मी पुढचं काही लिहीण्याची आवश्यकता नाही… हो ना? For more details- visit - www.prajaktaraj.in. फक्त पारंपरिक मराठी अलंकार मिळण्याचं एकमेव ठिकाण.(बाकी हे अलंकार आणि नऊवार नेसून; फोटोशूट वेळी मला एखाद्या राणीसारखं वाटत होतं. #भावना ) अशी कॅप्शन तिने दिली.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

फोटो व्हायरल

प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे. या शोमधील तिच्या लूकची बऱ्याचदा चर्चा होताना दिसत आहे.

Published by: Zee Team | Jun 29, 2023

VIEW ALL

Read Next Story