दरम्यान, ‘आटपाडी नाइट्स’, ‘बस्ता’, ‘झिम्मा’, ‘गोष्ट एका पैठणी’, ‘सनी’ अशा चित्रपटांमध्ये सायलीने भूमिका साकारली आहे.
सायली संजीवचा राजकीय क्षेत्रात देखील बराच दबदबा आहे. सायली संजीवची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट (MNS) कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती.
सायलीला आपलं नाव शॉर्ट असावं असं वाटत होतं. त्यामुळे तिने केवळ वडिलांचं नाव लावण्याचं ठरवलं आणि तेच नाव तिने स्विकारलं.
तर, सायलीचं खरं आडनाव आहे, चांदोस्कर. सायली संजीव चांदोस्कर असं तिचं पूर्ण नाव.
चित्रपटात देखील सायलीचं नाव पडद्यावर सायली संजीव असंच दिसतं. मात्र, सायलीचं खरं आडनाव तुम्हाला माहिती आहे का?
मराठी चित्रपटात सायलीने ताकदीच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र, अनेकादा सायलीचं नाव सायली संजीव, असंच दिसतं.
लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव ( Sayali Sanjeev) नेहमी चर्चेत असते. मराठी मालिका आणि मागील चित्रपटांमुळे तिचं नाव अनेकदा लोकांच्या कानावर आलंय.
मराठी चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमावणारी सायली संजीव चर्चेत असते. मात्र, सायलीचं खरं आडनाव अनेकांना माहिती देखील नाही.
साधा भोळा चेहरा, मराठमोळा पेहराव, काळसर डोळे, माथ्यावर छोटी टिकली अन् क्यूट स्माईल असं वर्णन केलं तर सर्वांसमोर एक चेहरा समोर येतो, तो सायली संजीव हिचा.