राजकुमारला मिळाली श्रद्धा कपूरपेक्षा जास्त फी, 5 मिनिटांमध्ये वरुणने कमावले इतके कोटी

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

'स्त्री 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 55 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वर्षातील सर्वात मोठी कमाई या चित्रपटाने केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार राव हा 'स्त्री 2' मधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

विकीची भूमिका साकारण्यासाठी त्याला 6 कोटी रुपये मानधन मिळाले. तर श्रद्धा कपूरला 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

तर 'स्त्री 2' या चित्रपटासाठी पंकज त्रिपाठीने 3 कोटी रुपये मानधन मिळाले.

अभिषेक बॅनर्जीने या चित्रपटात विकीच्या मित्राची भूमिका साकारली आहे. त्याला 55 लाख रुपये फी मिळाल्याची चर्चा आहे.

5 मिनिटांच्या भूमिकेसाठी वरुणला दोन कोटी रुपये फी देण्यात आल्याची चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story