Chanakya Niti: 'या' 5 चुका कधीच पैसे हातात राहू देत नाहीत

आचार्य चाणक्य यांनी नीति शास्त्रामध्ये मनुष्याच्या त्या चुका सांगितल्या आहेत ज्यामुळे माणूस गरीब राहतो.

आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाने कधीही आपल्या पैशाचा गर्व करु नये. जो व्यक्ती असे करतो तो जास्त दिवस श्रीमंत राहत नाही.

चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती निरुपयोगी गोष्टींवर पैसा खर्च करतो त्याच्याकडे पैसाही शिल्लक राहत नाही.

जर एखादी व्यक्ती जास्त कंजूष असेल तर त्याच्याकडे देखील जास्त पैसा शिल्ल्क राहत नाही.

जो व्यक्ती परमार्थासारख्या चांगल्या गोष्टींमध्ये पैसे कधीच गुंतवत नाही, त्याची संपत्ती कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपुष्टात येते.

चाणक्य यांच्या मते, माता लक्ष्मीला घाणीचा वीट आहे. माणूस स्वत: घाण करतो आणि घरात घाण ठेवतो. त्याच्याकडे पैसे राहत नाहीत.

VIEW ALL

Read Next Story