23 वर्षांमध्ये इतकी बदललीये RHDM ची स्टारकास्ट

मॅडी

2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटानं प्रेक्षकांवर चांगलील भुरळ पाडली होती. याच चित्रपटात 'मॅडी' या मध्यवर्ती भूमिकेत झळकलेला आर माधवन उतरत्या वयातही तरुणींच्या मनाचा ठाव घेत आहे.

रीना

'रीना' हे पात्र साकारणारी दिया मिर्झा आजही तितकीच सुंदर दिसते. दिया सध्या तिच्या कुटुंबाला अधिक वेळ देताना दिसते.

राजीव

चित्रपटात 'राजीव'च्या भूमिकेत झळकणारा सैफ अली खान आजही कलाजगतातील नवाबी थाटामुळं चर्चेत असतो.

मॅडीचा मित्र

RHDM मध्ये मॅडीच्या मित्राच्या रुपात झळकलेल्या अभिनेता कबीर सदानंद यानं कलाजगतापासून सध्या दुरावा पत्करल्याचं पाहायला मिळतं.

बुके डिलीव्हरी बॉय

जाणून आश्चर्य वाटेल पण, अभिनेता जॅकी भगनानी या चित्रपटामध्ये बुके डिलीव्हरी बॉय म्हणून झळकला होता.

बॅकग्राऊंड डान्सर

डेझी शाह या चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकली होती. तीसुद्धा हल्ली तिच्या अदांनी अनेकांनाच घायाळ करताना दिसते.

दीन दयाल

RHDM मध्ये दीन दयाल ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनुपम खेर यांनी या चित्रपटानंतरही अनेक भूमिका साकारल्या.

VIEW ALL

Read Next Story