राजस्थानचे पुर्व डेप्यूटी सीएम आणि कॉंग्रेस कार्य समितीचे अध्यक्ष सचिन पायलट आणि त्यांची पत्नी सारा पायलट यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे.

जम्मू आणि काश्मिरचे पुर्व मुख्यमंत्री फारूख अब्दूल्ला यांची सारा ही कन्या आहे. ओमर अब्दूल्ला यांची बहीण आहे.

त्यांचे लग्न हे 2004 साली संपन्न झाले होते. सोबतच त्यांना दोन मुलं देखील आहेत.

सचिन पायलट यांच्या इलेक्शन एफिडेविट म्हणजे निवडणूकीच्या प्रतिज्ञा पत्रातून याचा खुलासा झाल्याचे समोर झाले आहे.

त्या दोघांचाही प्रेमविवाह झाला होता. फक्त राजकारणच नाही तर एक जोडपं म्हणूनही त्यांची माध्यमांमध्ये चर्चा होती.

टोंक विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांची जो अर्ज दाखल केला होता.

त्यातील पतिज्ञापत्रात पत्नीच्या नावासमोर घटस्फोटित असं नमूद केले आहे.

VIEW ALL

Read Next Story