याच सावित्रीबाईंचे विचार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं अतिशय मनोभावे तिच्या मुलीपर्यंत पोहोचवले. काळीज काढून द्यावं, या भावनेनं सोनालीनं कॅप्शनमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि सावित्रीबाईंना अभिवादन केलं.
'तुझ्याकडं गाडी बंगला असो / नसो.., तुझ्याकडं पैसाअडका असो / नसो..तुझ्याकडं भारीतले कपडे मोबाईल असो / नसो..तुझं लग्नं झालेलं असो / नसो..पण तुझ्या माथ्यावर आपल्या सावित्रीबाईंनी कोरलेली ज्ञानाची आस - आजन्म राहो..ही चिरी कुणाच्या नावाची नाही..; ही तुझी आहे..; तुला आत्मसन्मान शिकवणारी..!' असं तिनं लिहिलं.
सावित्रीबाईंच्या कपाळी असणारी चिरी सोनालीनं तिच्या लेकीच्याही कपाळी लावली आणि तिला या चिरीचं महत्त्वं पटवून दिलं.
सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं सोनाली कुलकर्णी कायमच विविध मार्गांनी त्यांना अभिवादन करत असते. मुख्य म्हणजे आपल्या कृतीतून ती हा वारसा पुढच्या पिढीलाही देताना दिसते.
सोनाली कुलकर्णी आणि तिची मुलगी कावेरी यांचं एक सुरेख नातं कायमच सोशल मीडियामुळं पाहायला मिळालं आहे. लेकीला विचारांचं बळ देण्यासाठीच सोनालीची कायम धडपड असते.
सोनाली आणि तिचं संपूर्ण कुटुंब कायमच कावेरीच्या सर्वांगीण विकासावर भर देताना एक व्यक्ती म्हणूनही तिच्यावर सुरेख आणि अनुकरणीय संस्कार करताना दिसतात.
सोनाली कुलकर्णी तिच्या मुलीला देत असलेले संस्कार तुम्हीही तुमच्या मुलाबाळांना द्यावेत असेच आहेत, नाही का...