क्वचितच एखादा भारतीय असेल ज्याने आतापर्यंत रेल्वेने प्रवास केला नाही. ट्रेनचं तिकिट, ट्रेनचं लोकेशन सांगणारे अनेक ॲप उपलब्ध आहेत.

Jan 03,2024


पण भारतीय रेल्वे एका नव्या योजनेवर काम करतंय. या योजनेअंतर्गत 'ऑल इन वन ॲप' तयार केलं जात आहे. यात रेल्वेचे सर्व ॲप एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.


'ऑल इन वन ॲप' च्या मदतीने युजर्स ट्रेनच्या बुकिंगपासून ट्रेनच्या लोकेशनपर्यंत तसंच रेल्वेसंबंधित इतर सेवांची माहिती एका क्लिकवर घेऊ शकणार आहेत.


रिपोर्टनुसार CRIS (Centre for Railway Information System) एक सुपर ॲप बनवत आहे.


रेल्वेच्या सुविधा घेण्यासाठी युजर्सना आपल्या मोबाईलमध्ये अनेक ॲप डाऊनलोड करावे लागतात. युजर्सचा हा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


'ऑल इन वन अॅप' ची सध्या चाचणी सुरु आहे. काही युजर्सच्या फिडबॅकच्या आधारे या अॅपमध्ये बदल केले जात असून हे ॲप यूजर फ्रेंडली असल्याचा दावा भारतीय रेल्वेने केलाय.


'ऑल इन वन ॲप' मध्ये सध्या असलेल्या IRCTC ॲपचाही यात समावेश करण्यात येणार आहे. याशिवाय IRCTC Rail Connect, RCTC eCatering Food on Track आणि IRCTC Air यांचाही समावेश करण्यात आलाय.

VIEW ALL

Read Next Story