'7-8 वर्षांची असताना त्या वृद्धाने मला चुकीच्या पद्धतीने...' अभिनेत्रीचा मन सुन्न करणारा अनुभव

कायमच चर्चेत

'फोर मोर शॉट्स', 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' या आणि अशा कलाकृतींमुळं कायमच चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री सयानी गुप्तानं नेहमी काही कमाल भूमिकांना निवड दिली.

एफटीआयआय

कोलकात्यात शालेय शिक्षण आणि पुण्याच्या एफटीआयआयमध्ये पदवी शिक्षण घेणाऱ्या सयानीनं कायमच विषयांवर तिची मतं मांडली. MeToo सुद्धा यास अपवाद ठरली नाही.

अप्रिय घटना

सयानीनं तिच्यासोबत घडलेल्या एका अप्रिय घटनेलाही वाचा फोडली होती. जिथं तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

वाईटपणे स्पर्श

'मी 7-8 वर्षांची होते तेव्हा एका वयोवृद्ध व्यक्तीनं बसमध्ये मला अतिशय वाईटपणे स्पर्श केला होता. मला अजून आठवतंय मी पूर्ण ताकदीनं त्याच्या पायावर पाय दिला होता', असं सयानी म्हणाली.

पायावर मार

पायावर मार बसताच तो माणूस ओरडला आणि तिथून निघून गेला. आपला अनुभव सांगताना प्रत्येक मुलीनं स्वत:चा बचाव स्वत:च केला पाहिजे, असं सयानी म्हणाली.

महिलांची जाणीव

प्रत्येक महिलेला पुरुषांच्या वक्रदृष्टीची जाणीव असते त्यामुळं कायमच सावध राहिलं पाहिजे आणि अशा मुद्द्यांवर मोकळेपणानं बोललं पाहिजे असंही सयानी म्हणाली.

लोकप्रियता

सयानीनं आतापर्यंत कायमच विविध मुद्द्यांवर मोकळेपणानं भाष्य केलं. तिचा हा स्पष्टवक्तेपणाही लोकप्रियतेमागचं एक कारण ठरतं असं म्हणावं लागेल.

VIEW ALL

Read Next Story