'या' पुणेकरांना घसघशीत बोनस जाहीर; नवरात्रोत्सवातच दिवाळी

Oct 09,2024

बोनस

पुण्यात यंदा काही खास कर्मचाऱ्यांना बोनसची लॉटरी लागणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीनं कर्मचाऱ्यांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.

दिवाळी

पुणे महापालिकेच्या 18000 कर्मचारी ते अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे.

टक्केवारी

यंदा कर्मचाऱ्यांना 8.33% बोनस देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे.

सानुग्रह अनुदान

पीएमसीच्या कर्मचाऱ्यांना फक्त बोनस नव्हे तर, 23 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

रक्कम

महापालिकेच्या वित्त आणि लेखा विभागाने त्याबाबतचं परिपत्रक जारी करत, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी ही रक्कम जमा होणार असल्याचं सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story