शाहरुखनं काय कपडे घालावेत ठरवतेय 'ही' तरुणी; पाहा कोण आहे ती...

कोण ठरवतं शाहरुख कोणते कपडे परिधान करणार?

शाहरुख किंवा गौरी नाही तर तो कोणते कपडे परिधान करणार याचा निर्णय हा शलीना नथानी घेते.

कोण आहे शलीना नथानी?

शलीना नथानी ही एक लोकप्रिय सेलिब्रिटी स्टायलिस्ट पैकी एक आहे.

हे आहेत शलीनाचे क्लायंट

शलीनाच्या क्लायंट लिस्टमध्ये फक्त शाहरुख खान नाही तर तिच्यासोबत दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, तमन्ना भाटिया देखील आहेत. याशिवाय ती रणवीर सिंगला देखील अनेकदा स्टाईल करते.

शाहरुखला आवडते कोणती स्टायलिंग?

शलीनानं 'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की 'शाहरुखला कार्गो पॅन्ट्स, चांगल्या कपड्याचे टी-शर्ट्स, ओव्हर साइज हूडीज आणि स्नीकर्स खूप आवडतात. त्यासोबत जॅकेट्स आणि चष्मे देखील आवडतात.'

शाहरुखचं वॉडरोब

'शाहरुख खानचं वॉडरोब इतकं मोठं आहे की अनेकदा त्याला स्टाइल करण्यासाठी बाहेरून कपडे आणण्याची गरज पडत नाही. इतकंच नाही तर त्याच्या कलेक्शनमध्ये असे ब्रॅंड्स आहेत जे भारतात मिळत नाहीत', असे शलीनानं सांगितलं.

शाहरुख इथे करतो शॉपिंग

शाहरुख सगळ्यात जास्त लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस आणि दुबईला शॉपिंग करतो.

शाहरूखचा आवडता शेड

शाहरुखला डार्क शेड्सचे कपडे परिधान करणे आवडतात. (All Photo Credit : Shah Rukh Khan Instagram and Shaleena Nathani Instagram)

VIEW ALL

Read Next Story