SRK च्या 'डंकी'चा टीझर रिलीज! पण 'डंकी' शब्दाचा अर्थ काय? टीझरमध्येच लपलीय हिंट

'डंकी'चा टीझर प्रदर्शित

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्तानं 'डंकी'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

डंकीचा अर्थ डंकी फ्लाइट!

डंकी फ्लाइटचा अर्थ असा आहे की एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी वापरण्यात येणारा मार्ग.

डंकी फ्लाइट साधारण फ्लाइटपेक्षा वेगळी!

डंकी फ्लाइट म्हणजे बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये थांबत आपल्याला ज्या देशात जायचं आहे त्या देशात जाणे.

डंकी फ्लाइट आहे धोकादायक

डंकी फ्लाइटनं आपण कोणत्याही देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करतो, मात्र त्यानंतर त्यांना परत आपल्या मायदेशी येता येत नाही.

डंकी फ्लाइटनं का करतात प्रवास?

आपल्याला ज्या देशात जायचं असतं तिथे आपल्याला कायदेशीरपणे जाता येत नाही म्हणून आजकाल तरुण मुलं ही डंकी फ्लाइटनं परदेशात जातात. दरम्यान, अशा पद्धतीनं परदेशात जाणाऱ्यांची संख्या देखील खूप आहे.

काय आहे शाहरुखच्या चित्रपटाची कहाणी

शाहरुख या चित्रपटात एका पंजाबी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर त्याच्या मित्रांना कशा प्रकारे इंग्लंडला घेऊन जाण्याचं स्वप्न पूर्ण करतो.

कधी होणार चित्रपट प्रदर्शित?

22 डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

VIEW ALL

Read Next Story