मिथुन चक्रवर्तीने कापले होते शक्ती कपूरचे केस, रुममध्ये केलं होतं बंद; अभिनेत्याचा खुलासा

शक्ती कपूरने सांगितली जुनी आठवण

बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरने आपल्या जुन्या दिवसांची आठवण सांगताना, एक धक्कादायक खुलासा केला आहे.

पुण्यातील धक्कादायक किस्सा

शक्ती कपूरने पुण्यातील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय शिकताना घडलेला एक किस्सा सांगितला आहे.

मिथुनने केली होती रॅगिंग

शक्ती कपूरने एका मुलाखतीत फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रॅगिंगबद्दल सांगितलं होतं. आपला सीनिअर असलेल्या मिथुनने रॅगिंग केल्याचा खुलासा त्याने केला होता.

फिल्म इन्स्टिट्यूटमधील तो प्रसंग

डीडी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत शक्ती कपूरने सांगितलं होतं की, "जेव्हा मी पुण्यात पोहोचलो तेव्हा माझ्या हातात बिअरची बाटली होती. मी स्वत:ला स्टार समजत होतो. राकेश रोशन मला हॉस्टेलवर सोडण्यासाठी आले होते".

बिअरची बॉटल घेऊन पोहोचले

"मी गेटवर पाहिलं तर एक व्यक्ती उभी होती, ज्याने धोतर नेसलं होतं. त्याची शरीरयष्टी चांगली होती. त्याच्या धोतरात अनेक छेद होते. तो व्यक्ती राकेश रोशनच्या पाया पडला," असं शक्ती कपूरने सांगितलं होतं.

मिथून चक्रवर्तीची ओळख

शक्तीने पुढे सांगितलं की "माझ्या हातात बिअरची बाटली असल्याने मी तिला पिणार का? असं विचारलं. त्यावर त्याने येथे हे पिण्याची परवानगी नाही असं सांगितलं. तसंच आपलं नाव मिथून चक्रवर्ती आहे सांगत ओळख करुन दिली".

मिथूनने खेचत नेलं

शक्तीच्या दाव्यानुसार, राकेश रोशन जाताच मिथूनने त्याचा पाय पकडला आणि खेचत एका रुममध्ये घेऊन गेला. सीनिअरला बिअर कशी काय ऑफर करतो असं मला विचारलं. यानंतर सगळेजण माझ्या केसाची खिल्ली उडवू लागले.

केसं कापले अन् पोहायला लावलं

त्यांनी माझे केस कापले. यामुळे मला फार वाईट वाटलं. नंतर त्यांनी मला रात्री 20 मिनिटं थंड पाण्यात पोहायला लावलं आणि म्हणाले सकाळ होताच दिल्लीला निघून जा, असं शक्तीने सांगितलं.

मिथूनने केली सुटका

यानंतर मिथूनने मला वाचवलं आणि सीनियरशी कसं वागलं पाहिजे हे सांगितलं. नंतर त्याने मला एका खोलीत बंद केलं, जेणेकरुन इतरांना मी हॉस्टेलमध्ये नाही असं वाटावं अशी माहिती शक्तीने दिली.

VIEW ALL

Read Next Story