विमानात सीट बुक करताना घ्या काळजी

ही सीट अजिबात बुक करु नका

जर फ्लाइटमध्ये भरपूर जागा रिकाम्या असतील आणि तुमच्याकडे सीट निवडीचा पर्याय असेल, तर तुम्ही विमानातील शेवटची सीट, म्हणजे टेल सीट बुक करू नये.

शेवटची सीट का बुक करु नये?

शेवटच्या सीटवर जास्तीत जास्त टर्ब्युलन्स होते. जेव्हा हवामान खराब होते तेव्हा विमान देखील हलू लागते, याला टर्ब्युलन्स म्हणतात.

वेळीच बुकिंग करा सीट

यामुळेच विमान कंपनीचे कर्मचारी नेहमी फ्लाइटमध्ये समोरच्या सीट बुक करण्याचा सल्ला देतात. सर्वात आरामदायी जागा मिळविण्यासाठी, लोकांनी वेळेपूर्वी बुकिंग केले पाहिजे.

पैसे वाचवण्यासाठी घेतात मधली सीट

कमी अंतराच्या फ्लाइटमध्ये बसताना पैसे वाचवण्याचा विचार करून लोक मधली सीट बुक करतात. पण लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर थोडे पैसे खर्चून चांगली सीट घ्यायला हवी

म्हणून पुढची सीट निवडायला हवी

मागच्या बाजूला बाथरूम असते, त्यामुळे लोकांनी पुढच्या सीटची निवड करावी. विमानात रो-5 ला लोकांना पसंती द्यायला हवी

जास्त जागा हवी असेल तर निवडा ही सीट

जर तुम्हाला अतिरिक्त लेगरूम मोफत हवे असतील तर बोईंग 737 मध्ये तुम्ही पाचव्या रांगेत विंडो सीट निवडावी. या सीटवरून, तुम्हाला विमानाचे पंख पाहायला मिळतील आणि अधिक लेगरूम मिळेल.

सगळ्यात जास्त सुरक्षित सीट कोणती?

विमानातील मधल्या सीटपेक्षा मागील दोन ओळींची सीट सुरक्षित मानली जाते. पुढच्या सीटवर बसणे धोक्याचे आहे, कारण ती विमानाचा पंखा जवळ असते. (सर्व फोटो - freepik.com)

VIEW ALL

Read Next Story