श्वेता तिवारी नेहमी सोशल मीडियावर तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
नुकतेच तिने जांभळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
तिच्या या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. श्वेता तिवारीच्या हटके लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
चाहते श्वेता तिवारीच्या फोटोंवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
अशातच एका चाहत्याने म्हटलं आहे की, तुला पाहून कोणीही बोलणार नाही की तू दोन मुलांची आई आहेस, अशी कमेंट केली आहे.
वयाच्या 44 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना टक्कर देते.