विमान प्रवासात तुम्ही एअर हॉस्टेस पाहिल्या असतील.
एअर हॉस्टेसच्या नोकरीबद्दल सर्वांनाच आकर्षण असतं.
एअर हॉस्टेस या क्रू मेंबरचा एक भाग असतात.
विमानाने परदेशात जाताना प्रवाशांचा व्हिसा तपासला जातो.
मग दुसऱ्या देशात जाण्यासाठी एअर हॉस्टेसकडेदेखील विसा असणे आवश्यक असते का?
कोणत्याही देशात ये-जा करण्यासाठी एअर हॉस्टेसनाही व्हिसा आवश्यक असतो.
पण एअर हॉस्टेसच्या व्हिसाचे नियम थोडे वेगळे आहेत.
काही देशात क्रू मेंबरसाठी क्रू व्हिसा जारी केला जातो. जो नॉर्मल व्हिसापेक्षा वेगळा असतो.
काही देशांमध्ये क्रू मेंबर्ससाठी जनरल डिक्लेरेशन पद्धत अवलंबली जाते.
याअंतर्गत विमान कंपनीला आपल्या क्रू मेंबर्सची माहिती देणे आवश्यक असते.