२६ वर्षीय श्रेया शर्माने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं.

'कसौटी जिंदगी की'मध्ये प्रेरणाची मुलगी स्नेहा बजाजच्या भूमिकेत श्रेया शर्माने सर्वांची मने जिंकली होती.

'लागा चुनरी में दाग', 'रोबोट' आणि 'चिल्लर पार्टी' व्यतिरिक्त श्रेया शर्माने अनेक तमिळ, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं.

श्रेया शर्माची स्टाईल आणि लूक आता खूप बदलला आहे. 19 वर्षात तिचं असं ट्रान्सफॉर्मेशन पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसत आहे.

श्रेया शर्माने जाहिरातींच्या जगातही खूप नाव कमावलं आहे. तिने वेगवेगळ्या भाषांमध्ये 150 हून अधिक जाहिराती केल्या आहेत.

श्रेया शर्माचे वडील व्यवसायाने इंजीनियर आहेत आणि आई डायटीशियन आहे. पण श्रेयाने अभिनयात करिअर करायचं ठरवले होतं.

तिने 2016 पर्यंत कामही केलं आणि त्यानंतर तिने एक्टिंगच्या या दुनियेला सोडचिठ्ठी दिली. श्रेया शर्मा आता व्यवसायाने कॉर्पोरेट वकील आहे.

VIEW ALL

Read Next Story