आधी घटस्फोट मग आजारपण, 3 वर्षे झगडली 'ही' अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटातील अभिनेत्री समांथा रुथ प्रभु हिच्यासाठी गेली 3 वर्षे संघर्षाने भरलेली होती. याविषयी बोलताना समांथाने सांगितल की, या अनुभवाने तिला कसे बदलले आहे.

2021 मध्ये समांथाचा तेलगू अभिनेता नागा चैतन्यपासून घटस्फोट झाला. दोघांनी 2017 मध्ये लग्न केले आणि 4 वर्षांनी वेगळे झाले.

2022 मध्ये समांथाने घोषित केले की तिला स्नायूंचा विकार 'मायोसिटिस' आहे. या उपचारासाठी तिने जवळपास वर्षभर अभिनय क्षेत्रामधून ब्रेक घेतला.

एका मुलाखतीत समांथाने सांगितले की, ती ऑगस्टपासून पुन्हा शूटिंगला येणार आहे.

तिच्यासाठी कठीण गेलेल्या तीन वर्षांबद्दल समांथा म्हणाली की ती आज जिथे आहे तिथे पोहोचण्यासाठी तिने अनेक संघर्ष पार केले.

समांथा म्हणाली, 'आपल्या सर्वांची इच्छा आहे की आपण आपल्या आयुष्यात काही गोष्टी बदलू शकू. कधीकधी मला वाटतं, मी जे सहन केलं ते मला करण्याची गरज होती का?'

पण मागे वळून पाहताना मला वाटतं की याशिवाय दुसरा कोणताही मार्ग असू शकत नव्हता.

लाइफ मेसेज शेअर करताना समांथा म्हणाली, 'आयुष्य तुमच्यावर जे काही फेकत, ते तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल. या गोष्टींमधून बाहेर पडणे हाच तुमचा विजय आहे.'

समांथा म्हणाली, 'मी स्वतःला आता आधी पेक्षा जास्त मजबूत फिल करते. असे यासाठी वाटते कारण, मी इथपर्यंत पोहचण्यासाठी अनेक संघर्षचा सामना केला आहे.'

समांथा म्हणते की आता तिचा अध्यात्मावर खूप विश्वास आहे आणि त्यालाच आपला 'बेस्ट फ्रेंड' मानू लागली आहे.

VIEW ALL

Read Next Story