'तुझ्यासोबतच्या आठवणी...' विकी कौशलची कतरिनासाठी कायच्या काय प्रेमळ पोस्ट

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विकी कौशल

जिच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहत होता, प्रत्यक्ष जीवनात त्याच अभिनेत्रीशी लग्न करणाऱ्या अभिनेता विकी कौशल याची चर्चा कायमच सुरु असते.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

प्रेमाचं नातं

अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या प्रेमाच्या नात्यापासून अगदी लग्नापर्यंत अनेक गोष्टी सुरुवातीला काही काळासाठी गुलद्स्त्यात होत्या. लग्नानंतर मात्र विकीनं आणि कतरिनानंसुद्धा एकमेकांवर असणारं प्रेम मोकळेपणानं सर्वांसमोर आणलं.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विकी आणि कतरिनाचे फोटो

हल्लीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याच्या निमित्तानं विकी आणि कतरिना रेड कार्पेटवर पोहोचले आणि त्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

वाढदिवस

चाहत्यांचं कायमच लक्ष वेधणाऱ्या या जोडीचे काही नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निमित्त ठरतंय ते म्हणजे कतरिनाचा वाढदिवस.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

गोड फोटो

पत्नीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विकीनं ही संधी साधत तिच्यावरील प्रेम पुन्हा एकदा दिलखुलासपणे व्यक्त केलं आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यानं काही गोड फोटो शेअर करत त्याला साजेसं कॅप्शनही दिलं आहे.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

शुभेच्छा

'तुच्यासोबत आठवणी बनवणं हा माझ्या जीवनातील एक सुरेख भाग आहे. वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा...' असं कॅप्शन त्यानं फोटोंना दिलं.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

जोडीदार

विकीनं फोटोला दिलेलं कॅप्शन पाहता, किमान शब्दात जोडीदारावरील प्रेम असं सुरेखरित्या व्यक्त करणाराच जोडीदार हवा... असंच अनेकजणींना वाटेल. नाही का?

Published by: Zee Team | Jul 16, 2024

VIEW ALL

Read Next Story