'गदर' विरोधात एकवटले होते पूर्ण बॉलिवूड, सनीने सांगितलं काय घडलं होतं?

बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याचा आगामी चित्रपट गदरच २ च्या प्रमोशनात व्यस्त आहे. 22 वर्षांनंतर तारा सिंह आणि सकीना ही जोडी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

Mansi kshirsagar
Jul 18,2023

100 कोटींचा गल्ला

2001मध्ये प्रदर्शित झालेला गदर एक प्रेम कथा तेव्हा ब्लॉकब्लास्टर ठरला होता. तेव्हा गदरने 100 कोटींचा गल्ला जमवला होता.

गदरमध्ये सनीची भूमिका

कपिल शर्मा शोच्या कार्यक्रमात गदर चित्रपटाबाबत सनीने एक खुलासा केला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी कसं वाटतंय? असा प्रश्न कपिलने सनीला केला होता. तेव्हा त्याने भीती आणि उत्साहित वाटतंय असं उत्तर दिलं होतं.

निर्मात्यांचा खरेदी करायला नकार

सनीने पुढे म्हटलं आहे की, जेव्हा गदर प्रदर्शित झाला तेव्हा इतका गाजेल असं वाटलं नव्हतं. हा पंजाबी चित्रपट आहे, असं सगळे म्हणायचे. निर्मात्यांनीही खरेदी करायला नकार दिला.

बॉलिवूड विरोधात

आम्हाला सुरुवातीला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. संपूर्ण इंडस्ट्री याविरोधात होती. लोकांनी थब्म डाउन करुन रिअॅक्शन दिली होती, असं सनी म्हणाला

बोलती बंद केली

सनीने म्हटलं आहे की, चित्रपट खरेदी करायला कोणीही निर्माता पुढे येत नव्हता. मात्र जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा प्रेक्षकांनीच सगळ्यांची बोलती बंद केली.

22 वर्ष का लागले

गदर एक प्रेम कथाचे यश पाहूनच आम्ही सीक्वेल बनवण्याचा निर्णय घेतला. 22 वर्ष यासाठी लागले कारण आम्हाला योग्य कथा मिळत नव्हती.

पुन्हा जाणार पाकिस्तानात

गदर -2मध्ये सनी देओल, अमीषा पटेल यांच्यासोबत उत्कर्ष शर्मादेखील दिसणार आहे. उत्कर्ष सनीच्या मुलाची भूमिका साकारणार आहे.

गदर -2 ची कथा काय?

गदर 2 चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धाभोवती फिरते. तारासिंग यावेळी मुलगा चरणजीतला भारतात आणण्यासाठी पाकिस्तानात जाणार आहे.

VIEW ALL

Read Next Story