Webseries On OTT : 'हिरामंडी', 'गुल्लक'ला मागे टाकत 'या' वेब सीरिजना प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद

सध्या ओटीटीवर वेबसीरिजने धुमाकूळ घातला आहे. 'पंचायत' आणि 'लापता लेडीज'सारख्या वेबसीरिजने ओटीटीवर सर्वांच लक्ष वेधून घेतलं.

मीडिया रिपोर्टनुसार, अ‍ॅमेझॉनवर सगळ्यात जास्त 'पंचायत' च्या तिसऱ्या भागाला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. तर नेटफ्लिक्सवर 'हीरामंडी'ला पसंती दिली.

2024 च्या सुरुवातीच्या सहा महिन्यात वेबसिरीज आणि 'कल्की'सारख्या सिनेमांनी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला.

मीडिया रिपोर्टनुसार, 'पंचायत' वेबसीरिज पाहणाऱ्यांची संख्या 28.2 मिलियन इतकी आहे.

यानंतर अ‍ॅमेझॉनवरील 'हिरामंडी' सिनेमाला 20.3 मिलियन प्रेक्षकांनी पसंती दिली.

सिद्धार्थ मल्होत्राच्य़ा 'इंडियन पोलिस फोर्स ' सिरिज 19.5 मिलियन प्रेक्षकांनी पाहिली असल्याचं सांगितलं आहे.

नेटफ्लिक्स आणि अ‍ॅमेझॉनबरोबरच डिस्ने प्लस हॉटस्टार रिलीज झालेल्या 'लीजेंड ऑफ हनुमान' या सिरिजला 14.8 मिलियन प्रेक्षकांनी पसंती दर्शवली.

त्याशिवाय गुल्लक-4 पाहणाऱ्यांची संख्या 12.1 मिलियन इतकी आहे.

JioCinema जिओ सिनेमावर सध्या बिग बॉस ओटीटीचा तिसरा सिझन सुरु आहे. हा सिजन पाहणाऱ्यांची संख्या 17.8 मिलियन इतकी आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' चे सर्व एपिसोड नेटफ्लिक्सवर आहेत. या शो' ला 4.5 मिलियन तर शार्क टँक इंडियाच्या तिसऱ्या सिझनला 2.5 मिलियन प्रेक्षकांनी पसंती दिली.

VIEW ALL

Read Next Story