ठरवून ठेवलेल्या मर्यादा ओलांडण्यास मी सध्या तरी तयार नाही. त्यामुळे एका मर्यादेत राहूनच मी सध्या गरज असेल तरच इंटिमेट सिन्स देते असं शुभांगीने सूचित केलं आहे.
एक अभिनेत्री म्हणून मला माझ्या कम्फर्ट झोनमधूनही बाहेर पडणं आवश्यक आहे. या एका कारणासाठी मी असे सिन्स करु शकते. मात्र यालाही एक मर्यादा आहे, असं सूचक विधान शिवांगीने केलं आहे.
खरोखरच गरज असेल तर मी असे इंटिमेट सिन देईल असं शिवांगीचं म्हणणं आहे. असे सीन देण्यासाठी मी कॅमेरासमोर कम्फर्टेबल होणं आवश्यक असतं, असं शिवांगी म्हणाली.
आपण भविष्यातही इंटिमेट सिन्स करताना दिसू शकतो असे संकेत देताना शिवांगीने प्रोजेक्टसाठी आवश्यक असेल तरच असे सीन देईल असं म्हटलं आहे.
शिवांगीने अचानक इंटिमेट सिन्स करण्यास होकार देण्यामागेही एक खास कारण आहे. या कारणाबद्दलचा खुलासा तिनेच 'पिंकव्हिला'ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.
मालिकेमध्ये काम करताना शिवांगीने कायमच इंटिमेट सिन्सनला विरोध केला. मात्र तिने 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत अनेक इंटिमेट सिन्स दिलेत.
आपले अनेक फोटो शिवांगी या अकाऊंटवरुन पोस्ट करत असते. कधी बोल्ड फोटोशूट तर कधी योगा करताने फोटो, व्हिडीओ ती चाहत्यांबरोबर शेअर करते. सोशल मीडियावर जरी बोल्ड फोटो शेअर करत असली तरी शिवांगीचा इंटिमेट सिन्सला आधी विरोध होता.
इंन्स्टाग्रामवर शिवांगी प्रचंड सक्रीय असून तिथे तिचे जवळजवळ 80 लाख फॉलोअर्स आहेत.
शिवांगीही टीव्ही मालिकेमधील भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय असून तिची लोकप्रियता सोशल मीडियावरुनही दिसून येते.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेच्या माध्यमातून देभरामध्ये प्रसिद्ध झालेली शिवांगी ही मूळची पुण्याची आहे.
हिंदी चित्रपटांबरोबर मालिकांमध्येही मराठमोळ्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसत आहेत. यामधील आघाडीचं नाव म्हणजे शिवांगी जोशी.