रणबीर कपूरचा बहुचर्चित चित्रपट Animal प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाची बरीच चर्चा आहे.
यावेळी या चित्रपटातून उपेंद्र लिमये यांच्या अभिनयाचेही कौतुक होताना दिसते आहे.
गुन्हेगारीचं उद्दातीकरण, हिंसा, पुरूषी मानसिकता, अपशब्द, लैंगिकता यामुळे या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. सध्या चित्रपटातील विषयाबद्दल उपेंद्र लिमये यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली आहे. यावेळी ते म्हणाले, ''चित्रपटात दाखवलेले सीन्स गरजेचे आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही. माझ्या कुटुंबियांच्या किंवा मित्रांच्याही 'आम्हाला त्यातील काही गोष्टी झेपल्या नाहीत' अशा प्रतिक्रिया मिळाल्या आहेत आणि ते असूही शकतं. सगळ्यांनाच आवडेल अशी कलाकृती निर्माण करणं अवघड आहे.''
पुढे ते म्हणाले की, ''अशा टाईपचा सिनेमा तू करू नकोस, असं विचारणारेही मला भेटतील. पण मला त्याचं काही वाटतं नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत.''
''एका सुपरस्टारनं कंटेट नसेल तर सेक्स आणि हिंसेचा आधार घ्यावा लागतो अशी कमेंट केली होती. पण याच्याशी मी सहमत नाही.''( Animal प्रदर्शित झाल्यानंतर आमिर खानचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तो जो दिग्दर्शक चांगली कलाकृती बनवू शकत नाही तेव्हा त्यांना सेक्स, हिंसेचा आधार घ्यावा लागतो असं म्हटलं होतं. ज्याचा संदर्भ उपेंद्र यांनी दिला असल्याचे कळते.)
''त्यापलीकडे जाऊन तुम्ही या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. ज्याप्रकारे त्यानं काम केलं आहे. पण प्रत्येकाला ते आवडेलच असं नाही.'', असं स्पष्ट मत त्यांनी माडलं आहे.