पुरातन वारसा असलेले मुंबईतील विठ्ठल रखुमाईच्या 'या' मंदिरांना नक्की भेट द्या

Published by: Zee Team | Jul 16, 2024

आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभं राहत ते विठूरायाचं रूप. आपल्या लाडक्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूरला जातात. पण मुंबईतील ही मंदिरं तुम्हाला माहित आहेत का ?

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विठ्ठल रूक्मिणी मंदिर, गिरगाव

गिरगाव परिसरातील हे विठ्ठल-रूक्मिणीचे मंदिर सुमारे 200 वर्षाहून अधिक जुनं आहे. या मंदिराला प्राचीन वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विठ्ठल रूक्मिणी मंदिर, वडाळा

हे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर ऐतिहासिक महत्त्व असलेले मुंबईतील सर्वात जुने मंदिर आहे. संत तुकारामांनी सुमारे 400 वर्षापूर्वीच या मंदिराचा पाया घातला होता. या मंदिराने वडाळाला एक नवी ओळख दिली.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, सायन

125 वर्ष जुनं असलेले सायनमधील हे मंदिर 1893 साली स्थापन करण्यात आलं. हे मंदिर आशिर्वाद अपार्टमेंट, लक्ष्मीबाई केळकर मार्ग सायन रोड येथे स्थित आहे.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्ट, माहीम

माहीम येथे असलेले विठ्ठल रखुमाई मंदिर हे 96 वर्ष जुनं असून 1916 साली बांधण्यात आलं. या मंदिरात असलेली गणेश आणि गरूडाची मूर्ती भाविकांच लक्ष वेधून घेते.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

विठ्ठल रखुमाई मंदिर, विलेपार्ले

विलेपार्ले येथे असलेले 81 वर्ष जुनं मंदिर 1935 साली स्थापन करण्यात आलं. या मंदिराल प्रवेश करताच मंदिराची माहिती देणारा शिलालेख नजरेस पडतो.

Published by: Zee Team | Jul 16, 2024

VIEW ALL

Read Next Story