मराठी कलाकार हे आता हिंदी चित्रपटसृष्टीतही आपलं नावं कमावू लागले आहेत. त्यांचीही सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते.
हिंदी मालिका, चित्रपट आणि वेबमालिकांतूनही ते काम करताना दिसतात. ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी देखील हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक कामं केली आहेत.
यावेळी त्यांची एक मुलाखत विशेष चर्चेत आहे. यावेळी त्यांनी 'लोकमत फिल्मी'च्या 'आपली यारी' या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
यावेळी त्यांनी मराठी कलाकार हे एकमेकांशी हिंदी चित्रपटाच्या सेटवर कसे वागतात यावर खुलासा केला आहे.
ते म्हणाले की, '''सिंघम' आणि 'सिंबा'सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये माझ्याबरोबर आणखी काही मराठी कलाकार होते. अशोक मामांनी काम केलं होतं. आमचा एकत्र सीन नव्हता पण सीन शूट झाल्यानंतर अशोक मामा मला हमखास फोन करायचे आणि आम्ही शूटनंतर गप्पा मारत बसायचो.''
''हे मराठी कलाकरांचं बॉंडिंग आहे. 'सिंबा' चित्रपटात सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सौरभ गोखलेसारखे मराठी कलाकार होते. सेटवर सगळे मला शोधायचे. चित्रपटात मराठी कलाकार असले की आम्ही एकत्र असायचो.''
''सगळे एकत्र बसा बॉंडिग होतं हे आम्हाला लक्ष्मीकांत बेर्डेने शिकवलं होतं. पण जेव्हा इतर वेळी मी सेटवर जातो तेव्हा आतून दरवाजा एकदा बंद केला की दुसऱ्या दिवशीच कॉल टाईमला उघडतो.'' असं ते यावेळी म्हणाले.