भारतीय क्रिकेट संघााचा स्टार फलंदाज शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचं अफेअर असल्याची चर्चा सोशल मीडियावर कायम सुरु असते.

अनेक सामन्यात शुभमनला चिअर करताना सारा स्टेडिअममध्ये दिसलीय. पण सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि शुभमन गिलने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काही दिवसांपूर्वी शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यात दोघही एकाच हॉटेलमधून बाहेर पडताना दिसले होते.

शुभमन-साराच्या अफेरच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळालंय. एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सारा तेंडुलकरचा हा व्हिडिओ आहे.

सारा तेंडुलकर आणि शुभमनची बहिण शहनील गिल एकत्र दिसल्या. दोघी एकाच कारमध्ये बसलेल्या होत्या. पापाराझींनी त्यांच्या कारला घेरलं होतं.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत साराने ब्लॅक करलचा एलिगेंट ड्रेस परिधान केला होता. कॅमेरापासून सारा चेहरा लपवताना दिसली.

सोशल मीडियावर सारा-शहनीलचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सारा-शुभमनच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. पण या केवल अफवा आहेत.

VIEW ALL

Read Next Story