'हे' मराठी चित्रपट पाहताना डोळ्यात अश्रू नाही आले तर सांगा


मराठी सिनेसृष्टी जेव्हा विनोदी चित्रपटांचे उत्तम नमुने प्रस्तुत करत होती, त्याच काळात काही गंभीर चित्रपटसूद्धा प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी मराठी चित्रपटांच्या कथानकांचा दर्जा उंचावला होता.

श्वास

2004साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजोबा आणि नातवाची कथा मांडतो. श्यामची आई या चित्रपटानंतर 50 वर्षांनी मराठी चित्रपटाला, उत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. हिंदी, बंगाली, तमिळ आदी भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अरुण नलावडेंनी आजोबांची भूमिका साकारली होती.

जोगवा

2009चा राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाने पटकावला होता.जोगता-जोगतीण अशा किचकट विषयावर चित्रपटाची रुपरेखा आधारित होती. अनिष्ट रुढींना झुडकावणाऱ्या मुलीची ही कथा आहे. मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमये आदी कलाकार चित्रपटात आहेत.

फॅन्ड्री

चित्रपटात प्रेमकथा असली तरी मुख्य चित्रपट जातीव्यवस्थेवर बोट ठेवणारा आहे. कठीण विषय योग्य हाताळत चित्रपट समाजाचे चित्र डोळ्यासमोर उभे करतो. बरेच पुरस्कार फॅन्ड्रीने पटकावले.

काकस्पर्श

2012साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात सचिन खेडेकर, प्रिया बापट आदी कलाकारांनी काम केले आहे. कर्मठ विचार पाळणाऱ्यांना किती त्रास होतो, ते चित्रपटातून स्पष्ट दिसून येते. चित्रपटाला बरेच पुरस्कार चित्रपटाला मिळाले आहेत .कथानक 20व्या शतकातील समाज व्यवस्थेला धरुन आहे.

नटरंग

2010साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची गाणी फारचं लोकप्रिय झाली. रसिकांची उदंड दाद चित्रपटाला मिळाली. तमाशा संस्कृतीच्या अवतीभोवती चित्रपट फिरतो. आनंद यादव यांच्या नटरंग या कादंबरीच्या कथानकावर चित्रपट आधारित आहे.

VIEW ALL

Read Next Story