'मुंज्या' आवडला? मग 'हे' हॉरर आणि कॉमेडी चित्रपट नक्कीच पाहा

Published by: Zee Team | Jun 21, 2024

भूल भुलैया

2007 मध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालननं 'भूल भुलैया' सारख्या हॉरर चित्रपटानं प्रेक्षकांना केवळ घाबरवलंच नाही तर खूप हसवलं सुद्धा.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

स्त्री

2018 मध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री' या चित्रपटानं प्रेक्षकांना वेड लावलं होतं... आता त्याचा दुसरा भाग देखील येतोय जो पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

भूतनाथ

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या भूतनाथ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अमन सिद्दीकी यांच्यातील जुगलबंदीनं सगळ्यांचे मनोरंजन केले होते.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

गोलमाल अगेन

2017 मध्ये प्रदर्शित झालेला मल्टीस्टार गोलमाल अगेनमध्ये हॉरर आणि मध्येच कॉमेडीचा टच होता. हा चित्रपट देखील चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

भूतनाथ रिटर्न्स

2014 मध्ये सुपरहिट झालेल्या या सिक्वेलमध्ये अमिताभ बच्चन हे पुन्हा एकदा भूताच्या भुमिकेत दिसले तर त्यांच्यासोबत मराठमोळा पार्थ भालेराव दिसला होता.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

भूल भुलैया 2

कार्तिक आर्यन, कियारा आडवाणी आणि तब्बू यांनी या चित्रपटात काम केले असून 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

भेडिया

भेडिया या चित्रपटात वरूण धवन आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत दिसले होते.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

गो गोवा गॉन

2013 प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये सैफ अली खान, कुणाल खेमू आणि वीर दास यांनी महत्त्वाच्या भूमिका साकरल्या होत्या. हा चित्रपट हास्यविनोदांमुळे सुपरहिट झाला.

Published by: Zee Team | Jun 21, 2024

VIEW ALL

Read Next Story