राष्ट्रीय चित्रपट दिन

भारतीय चित्रपटसृष्टी 13 ऑक्टोबर रोजी 'राष्ट्रीय चित्रपट दिन' साजरा करत आहे. या खास दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सर्व चित्रपटांच्या किमती एका दिवसासाठी 99 रुपयांपर्यंत कमी केल्या जातील.

सर्व चित्रपटगृहांमध्ये मिळणार तिकीटे?

नाही, सर्व थिएटरमध्ये 99 रुपयांमध्ये तिकिटे उपलब्ध होणार नाहीत. अनेक चित्रपटगृहे यात सहभागी होत नाहीत. त्यामुळे 2D, 3D, IMAX आणि 4DX थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यासाठी तुम्हाला 99 रुपयांपेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.

99 रुपयांत कसे तिकीट बुक करायचे?

ऑनलाइन आणि ऑफलाइन प्रकारे चित्रपटाची तिकिटे बुक करू शकता. BookMyShow आणि Paytm सारख्या प्लॅटफॉर्मवरही तिकीटे मिळवू शकता.

असं मिळवा 99 रुपयांत तिकीट

आधी बुकिंग प्लॅटफॉर्मवर जा. जो चित्रपट बघायचा आहे त्यावर क्लिक करा. 13 ऑक्टोबर निवडा. तुमच्या शहरातील कोणती चित्रपटगृहे 99 रुपयांची तिकिटे देत आहेत याची माहिती तुम्हाला मिळेल.

99 मध्ये कोणते चित्रपट पाहता येतील?

99 रुपयांमध्ये, तुम्ही जवान, मिशन राणीगंज, थँक यू फॉर कमिंग, फुक्रे 3 यासारखे चित्रपट पाहू शकता. गुठली लाडू, धक धक, अब तो सब भगवान भरोसे या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट दिनाचा फायदा होणार आहे.

इथे मिळणार नाही तिकिटे

ही ऑफर देशभरात लागू आहे पण आंध्र प्रदेश, पाँडिचेरी, तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये तिकीटे उपलब्ध होणार नाही.

कोणत्या थिएटरमध्ये दाखवणार चित्रपट?

यावर्षी PVR, Inox, Cinepolis, Miraj, City Pride, Asiam, Mukta A2, Movei Time, Wave, M2K, Delite यासह अनेक मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट दाखवले जाणार आहेत.

VIEW ALL

Read Next Story