अभिनेत्रींपेक्षाही सुंदर दिसते रितेश देशमुखची बहीण

Published by: Zee Team | Aug 29, 2024

बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता रितेश देशमुख हा सध्या 'मराठी बिगबॉस ५' मुळे अधिक चर्चेत आहे. रितेश यंदा बिगबॉस मराठीचं होस्टिंग करत असून त्याचा विकेंडला येणारा 'भाऊचा धक्का' टीआरपीचे रेकॉर्डस् मोडत आहे.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

रितेश देशमुखचे फॅन्स त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुक असतात. तेव्हा आज रितेश देशमुख याच्या बहिणीबद्दल जाणून घेऊयात.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

रितेश देशमुख हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आहे. रितेशला सख्खे दोन भाऊ अमित आणि धीरज हे दोघे सध्या विधानसभेवर आमदार आहेत.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

रितेश याला सख्खी बहीण नाही, परंतू त्याचे सख्खे काका म्हणजेच विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख यांची कन्या गौरवी हिच्यावर रितेश सख्ख्या बहिणीप्रमाणेच प्रेम करतो असे स्वतः त्याने एका मुलाखतीत सांगितले होते.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

गौरवी देशमुख या उच्च शिक्षित असून ती जागृती साखर कारखान्याची चेअरपर्सन आहे. गौरवी यांचे लग्न कराडमधील राजकारणी आणि सध्या भाजपमध्ये असलेले अतुल देशमुख यांच्याशी झाले.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

गौरवी आणि अतुल यांचे लग्न हे पुण्यातील आलिशान हॉटेलमध्ये झाले होते. या लग्नात गौरवी यांच्या भावाची सर्व कर्तव्य ही रितेश आणि त्याचे दोन भाऊ अमित आणि धीरज यांनी पार पाडली.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

गौरवी या दिसायला खूपच सुंदर असून त्या सामाजिक कार्यात सुद्धा पुढे असतात. गौरवी सामाजिक कार्यांबाबत सभांमधून बोलून युवकांना देखील प्रेरणा देताना दिसतात.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

गौरवी यांचा वाढदिवस 29 ऑगस्ट रोजी असून या निमित्ताने रितेश आणि त्याच्या भावांनी गौरवी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Aug 29, 2024

VIEW ALL

Read Next Story