गोविंदाच्या आईचं नाव निर्मला देवी असं होतं. त्यांनीच गोविंदाला ची-ची हे नावं दिलं आहे.
पंजाबी भाषेत ची-ची म्हणजे करंगळी आण त्याशिवाय त्याचा अर्थ ताकद आणि एकता असा आहे.
आता हे नावं कुठून आलं तर हे नाव कृष्णाच्या गोष्टीवरून आहे ज्यात तो त्याच्या गावातील लोकांना आणि मित्रांना वाचवण्यासाठी करंगळीवर पर्वत उचलतो.
गोविंदा हा त्याच्या भावंडांमध्ये सगळ्यात छोटा होता आणि आईच्या जवळचा होता म्हणून त्यालं हे नावं दिल्याचं म्हटलं जातं.
गोविंदानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की 'त्याच्या कुटुंबानं, शिक्षकांनी, घरातील मोठ्यांनी आणि जवळच्या मित्रांनी ची-ची म्हणून त्याला हाक मारली तर त्याला ते आवडतं.'
गोविंदानं एका मुलाखतीत हे देखील सांगितलं होतं की 'त्याला त्याच्या चाहत्यांनी किंवा सार्वजनिक ठिकणाी त्याला ची-ची म्हटलेलं.'