राजघराणीतील लेकीने झहीर खानशी लग्न केल्यावर का सोडली इंडस्ट्री?
शाहरुख खानचा सिनेमा 'चक दे इंडिया' मधून बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणारी सागरिका घाटगे चाहत्यांचं मग जिंकते.
'चक दे इंडिया' सिनेमात सागरिका हॉकी प्लेअर प्रीति सबरवालची भूमिका साकारते. शाहरुख खान या सिनेमात कोचची भूमिका साकारतो.
महत्त्वाचं म्हणजे सागरिका खऱ्या आयुष्यातही नॅशनल लेवल हॉकी प्लेअर आहे.
'चक दे इंडिया' सिनेमासोबतच दुसरे सिनेमे केले आहेत. तिने फॉक्स, मिले न मिले हम या सिनेमातही काम केलंय.
हिंदी सिनेमांसोबतच सागरिकाने पंजाबी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2019 मध्ये अल्ट बालाजीच्या वेब सीरिज बॉस: बाप ऑफ स्पेशल सर्विसमधून डिजिटल डेब्यू देखील केला.
सिनेमा आणि वेब सीरिजसोबतच सागरिका स्टंट बेस्ड रिऍलिटी शो 'खतरों के खिलाडी6' मध्ये देखील सहभागी झाले होते. शोची ती फायनलिस्ट राहिली होती.
37 वर्षांची सागरिका राजघराण्याशी संबंधित आहे. सागरिकाचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापुरमध्ये झाला आहे. तिची आजी सीता राजे घाटगे इंदौरचे महाराज तुकोजीराव होळकर यांची मुलगी आहे.
करिअरमध्ये सर्वोत्तम पदावर असताना भारताची माजी खेळाडू झहीर खानसोबत लग्न केलं. 2017 एप्रिलमध्ये झहीर आणि सागरिकाने साखरपुडा केला आणि नोव्हेंबक 2017 मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केलं.
लग्नानंतर सागरिकाने इंडस्ट्री सोडली. ती पतीसोबत आनंदाने जीवन जगत आहे.
तसेच सागरिका आता आपल्या व्यवसायात व्यस्त आहे. तिने इंडस्ट्री सोडली असली तरीही ती कामात व्यस्त आहे.