2023 चा वर्ल्ड कप आतापर्यंत टीम इंडियासाठी खूप चांगला जात आहे.

संघाने आपली विजयी धुरा कायम राखून सलग 6 सामने जिंकत पॉईंट्स टेबल मधले आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

असे असले तरी टीम इंडियाचा स्टार ओपनर शुभमन गिलच्या फॉर्म बद्दल आता चिंता वाढली आहे.

गिलला या स्पर्धेत आतापर्यंत एकही मोठी खेळी खेळता आलेली नाही.

अशा परिस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या पुढील सामन्यात रोहित शर्माचा सलामीचा जोडीदार बदलला जाण्याची शक्यता आहे.

वर्ल्ड कपच्या सुरुवातीचे 2 सामने शुभमनला डेंग्यूमुळे खेळता आले नव्हते.

त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात शुभमनचे पुनरागमन झाल्यावरही त्याच्याकडून अपेक्षित अशी खेळी आलेली नाहीये.

त्यामुळे आता 2 नोव्हेंबेरला होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शुभमनला ड्रॉप करून ईशान किशनला संघात जागा मिळू शकते.

VIEW ALL

Read Next Story