गणेश आरतीमधील 'या' शब्दांचा उच्चार करतात चुकीचा

दरवर्षी घरोघरी गणरायाचे थाटामाटात आगमन होते, भाविक उत्साहात आरत्या म्हणतात. पण तुम्ही गणेशाची आरती नक्कीबरोबर म्हणताय का? आरती म्हणताना आपण फार सामान्य चुका करतात. यावर्षी या चुका टाळा.

ओटी शेंदुराची नाही तर ते उटी शेंदुराची असे आहे.

फळीवर वंदना हे वाक्य आरतीचा अर्थच बदलून टाकते योग्य वाक्य फणिवर बंधना असे आहे.

वक्रतुंड त्रिनेमा असे न म्हणता वक्रतुंड त्रिनयना असे म्हणा.

दासरामाचा वाट पाहे सजणा नाही तर दासरामाचा वाट पाहे सदना

संकष्टी पावावे नसून ते संकटी पावावे असे आहे.

ओवाळू आरत्या सुरवंट्या येती सुरवंट्या नाही तर आरतीतल्या कुर्वंड्यांचा उल्लेख आहे. योग्य वाक्य ओवाळू आरत्या कुर्वंड्या येति असे आहे.

लवलवती विक्राळा नाही तर लवथवती विक्राळा असे म्हणा.

VIEW ALL

Read Next Story